बाबा
बाबा
तुम्ही माझे आधारस्तंभ
तुम्हीच जीवनातील पाहिले गुरू
उपकार तुमचे इतके माझ्यावर
तुमच्यासाठी नक्की काय करू?
किती तुमच्यावर जबाबदाऱ्या
कसे पाडता हो पार?
देवाला विचारावस वाटतं
का बाबांवर च असतो भार?
पडता माझ्यावर सावली अंधाराची
ढाल होऊन लढता माझी
किती विश्वास हो बाबा
मुलीवर तुमच्या ठेवता तुम्ही ?
माझ्यासाठी जगाशी लढता
विश्वास माझ्यावर पूर्ण ठेवता
माझी मुलगी हे करणार नाही
जगाला हे ठामपणे सांगता
वचन देते आज तुम्हाला
विश्वास तुमचा अटळ राहील
तुमची मुलगी तुमच्याशी
नेहमीच प्रामाणिक राहील
तुमच्यामुळे अस्तित्व माझे
तुमच्यासारखेच विचार माझे
प्रत्येकाला अभिमानाने सांगते
की हेच आहेत बाबा माझे
प्रामाणिक राहा, निडर राहा
संकटांपासून दूर जाऊ नकोस
स्वतःकडून चूक झाली असता
ती मान्य करायला घाबरू नकोस
तुम्ही दिलेली शिकवण
नाही विसरणार जीवनभर
तुम्हीच तर म्हणता ना बाबा
एक "समिधा" आहेस तू तर
