घडले का असे काही
घडले का असे काही
घडले का असे काही ..
घडले का असे काही की,
मी काहीही न बोलता
सारं काही तू ओळखशील
शब्दांचा खेळ न मांडता
अबोल माझ्या भावनांना समजशील..
घडेल का असे काही की,
सुंदर स्वप्ने तू मला देशील
स्वप्नांच्या त्या नगरीमध्ये
नकळत कुठेतरी दिसशील..
घडेल का असे काही की,
आनंदाच्या वाटेवर तू मज नेशील
साथ माझी देऊन काही
पाऊले सोबत चलशील..
घडेल का असे काही की ,
स्वप्नाच्या फुलांची उधळण
तू माझ्यावर करशील
सुगंधात त्या फुलांच्या मग
तल्लीन जरासा होशील..
घडेल का असे काही की,
शेवटच्या श्वासापर्यंत मनाचे मनाशी
असलेले नाते तू टिकवशील
मोठ्या मनाने चुका माझ्या
पदरात तुझ्या घेशील..
