ठरवलं आहे
ठरवलं आहे
ठरवलं आहे..
कुठे होते मी
माहितीनाही
आता शोध सुरू आहे ..
सुख खूप कमी होत
म्हणून जशास -तसे
वागायचं ठरवलं आहे ..
चांगल्या गोष्टी
वाटून घ्यायला नव्हत्याच
म्हणून शांत
राहायचं ठरवलं आहे ..
कधी कोणी विश्वास
जिंकलाच नाही
म्हणून विश्वासाशी
नातं तोडायचं
ठरवलं आहे ..
दुसऱ्यांची मदत
कधी केलीच नाही
असं नव्हतं
म्हणून स्वतःचीच
मदत करायची
ठरवलं आहे..
प्रतिस्पर्धा डोक्यात
कधी आलीच नाही
म्हणून शांतपणे
जीवन जगायचं
ठरवलं आहे ..
