पुरूष
पुरूष
हिमालयासारखा
स्थिर तू
स्तब्ध तू
स्थिरजीवी तू
संयमी तू//१//
काटेरी गुलाबाच्या फुलासारखा
आकर्षक तू
अभिरुप तू
अभिजात तू
अभिजातक तू//२//
सूर्याच्या किरणांसारखा
तेजस्वी तू
तेज दार तू
तीव्र तू
तेजायमान तू//३//
संथपणे वाहणाऱ्या झऱ्यासारखा
शांत तू
शब्दरहित तू
शांतीपूर्ण तू
शांततामय तू//४//
असंख्य जीवांचा असरा
असणाऱ्या समुद्रासारखा
पोशिंदा तू
पालनकर्ता तू
पोसणारा तू
पालनहार तू//५//
✍️कविता सचिन रोहणे
सातारा ,महाराष्ट्र
