STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Classics Fantasy Others

4  

Kavita Sachin Rohane

Classics Fantasy Others

नवरात्री

नवरात्री

1 min
7


    
सोनियाच्या पावली
 दिवस आला चालत
घटस्थापनेचा मुहूर्त
 घेऊनीया//१//
नऊ दिवस हे आनंदाचे
 चैतन्याचे अन् सौख्याचे
 घेऊन नाव अंबेचे
 जागरण करावयाचे//२//
अखंड दिवा देवतो तेज घेऊनी
प्रकाशमान होई दाही दिशा
 माते तुला आशीर्वाद मागतो
 हा वेडा भक्त तुझा//३//
नवरूप तुझे अद्भुत 
अर्थपूर्ण अन् अविरत
 तारावया भक्तजना या धरणीवर//४//
माते तुझी साथ
 हीच माझी शक्ती 
आनंद होतो मना
 करुनी तुझी भक्ती//५//



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics