सहवास तुझा
सहवास तुझा
अनोळखी वळणावर
अचानक आपण भेटलो
साथ एकमेकांची देण्यास
कधीच नाही हटलो //१//
कळलच नाही मला
कधी प्रेम झालं
सहवासात तुझ्या
मन भिजत राहिलं //२//
अश्रू माझ्या डोळ्यातील
बघवत नाही तुला
तुजविण सख्या
करमत नाही मला //३//
लागली असते
सतत तुझीच ओढ
प्रेमाची तुझ्या गोडी
साखरेहून गोड//४//
लाभो तुझा सहवास
हेच कायम वाटे
प्रेमळ तुझी आठवण
मनी माझ्या साठे//५//

