STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Drama Tragedy Inspirational

4  

Kavita Sachin Rohane

Drama Tragedy Inspirational

स्वतःशी संवाद

स्वतःशी संवाद

1 min
5

स्वतःशी संवाद
खूप काही सांगायचं आहे तुला
 कसं सांगावं हा प्रश्न होता
 म्हणून हे एक पत्र तुझ्यासाठी
 लिहून व्यक्त व्हायचय मला//१//
सुरुवात करूया बालपणापासून
 जिथे होता फक्त आनंद
 अजूनही आठवतो मला 
तो खेळ -खेळण्याचा छंद//२//
थोडं मोठं झाल्यावर 
आला पुस्तकांचा पाठीवर भार 
कारण शिकवलं जात होतं 
की शिक्षणातच दडलेल आहे
 प्रगतीचं द्वार//३//
मग झाली होती घाई 
ओळख निर्माण करायची 
सवडच नव्हती मग 
स्वतःकडे बघायची//४//
जेव्हा वय वाढत गेलं 
तेव्हा जाग आली 
जगताना काय कमी पडलं
असं म्हणत मन 
तुलाच साद घाली//५//
✍️कविता सचिन रोहणे 
सातारा ,महाराष्ट्र


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama