कन्यादान
कन्यादान
कन्यादान
कन्या असते मायबापाच्या जीवाचा तुकडा चैन पडत नाही हो जर बघितला नाही तिचा मुखडा//१//
लहान असताना
लळा लावते
तिच्यामध्येच
व्यस्त ठेवते//२//
जस जशी
होते मोठी
चिंता होत जाते
छोटी छोटी//३//
मग येते वेळ
तिच्या विदाईची
जपून ठेवलेला
काळजाचा तुकडा
दान करायची//४//
ओढ मात्र कायम असते काय करत असेल
हेच सारखा
मनाला भासते//५//
कन्यादान काय असतं हे आई-वडिलांनाच माहीत तिच्या सुखातच मग त्यांचे सर्व सुख असते समाहित //६//
