STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Drama Tragedy Action

4  

Kavita Sachin Rohane

Drama Tragedy Action

बरस रे मेघराया

बरस रे मेघराया

1 min
1

बरस रे मेघराया
काळ्या,काळ्या मेघांनो बरसा ना तुम्ही आता थकलेत आता डोळे वाट तुमची पाहता//१//
धरणी सुकली,पान-फुले कोमेजून गेली 
पांढऱ्या नभी काळी छटा कुणीही न पाहिली//२//
प्राणी,पक्षी झाले व्याकुळ कोण भागवेल तहान त्यांची का लावलीस तू परीक्षा 
या मुक्यांची//३//
शेतकरी झाला हैराण दुष्काळाचे सुटले वारे 
साकड घालून देवाला बसलेत आता सारे//४//
बरस रे,मेघराया आता तरी थोड
 चुकलं असेल आमचं काही
 तर राग आता सोड//५//
✍️कविता रोहणे 
सातारा, महाराष्ट्र


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama