STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Abstract Tragedy Others

4  

Kavita Sachin Rohane

Abstract Tragedy Others

माझी माय

माझी माय

1 min
3

माझी माय
घरात पाऊल ठेवताच
 आतून आवाज येतो
  "आली का गं ,तू"
 चल, हात पाय धु
 गरम गरम जेवायला वाढते,
 असं म्हणणारी माझी माय//१//
आजारी असतांना
डोक्यावरून सतत हात फिरतो,
 लवकर बरी होशील
  "देव ,तुला लवकर बरं करेल ,
 असं म्हणणारी माझी माय//२//
कामा निमित्त
घराबाहेर पडल्यावर
 जरा का उशीर झाला ,
तर फोन येतो
 "कुठे आहेस ,किती वेळ लागेल ,
असे असंख्य प्रश्न
 विचारणारी माझी माय//३//
 जरा उदास चेहरा दिसला
 की,लगेच जवळ येऊन
 "काय झालं, काय त्रास आहे?
 विचारणारी माझी माय//४//
आनंदाची गोष्ट जीवनात
 घडली असता
  "खूप छान झालं,
अशीच प्रगती कर
असं म्हणणारी माझी माय//५// 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract