STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Drama Tragedy Others

4  

Kavita Sachin Rohane

Drama Tragedy Others

सहजीवन

सहजीवन

1 min
1

 हो, घालतो तो लग्न वेळी तिच्या गळ्यात त्याच्या नावाचं डोरलं मग चुकलं कुठे? तुम्हीही घाला ना एखादी चैन त्याच्या गळ्यात तुम्हाला कुणी आहे का अडवल? //१// खूप नटून-थटून जाता वडाजवळ त्याची सात जन्मी साथ मिळावी म्हणून आणि घरी आल्यावर त्याच्या वरच चिडचिड का गं करता//२// करू द्या ना, त्याला त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण तुम्ही तुमच्या कामात लक्ष घाला थोडे तुझे थोडे माझं करत संसाराचा गाडा ओढत चला//३// नसते हो त्याला काही अपेक्षा तुमच्याकडून हवे असतात दोन प्रेमाने बोललेले शब्द तेवढे तर जमेलच ना तुम्हाला यापूर्वी की तो होईल निशब्द //४// प्रत्येक गोष्टीचा राग जर त्याच्यावरच निघत असेल तर त्याला काहीच नाही ना अर्थ नुसतं तू-तू,मै-मै करण्यातच मग निघून जाईल हो सगळं जीवन व्यर्थ//५// ✍️कविता रोहणे सातारा महाराष्ट्र


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Drama