STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Drama

3  

अमोल धों सुर्यवंशी

Drama

धिंगाणा

धिंगाणा

1 min
306

रोज करते

छोट्या छोट्या गोष्टीवरून झगडा.

घर घर नसून झालाय विरोधी पक्षांचा अड्डा.


तू भेटलीस सखे,

वाटूळ्याचे गुंडगुळ झालं.

रंगत नाही मित्रांची मैफील.

तू तर तालिबान राहिफल.

साऱ्या चिंद्या झाल्या नशिबाच्या,

मखमली आयुष्य काट्याने भरलं.


बायकोच्या फोटोकडे बघत,

 नवऱ्याचं मन गहिवरलं.

समोर येऊन बायकोनं

 विचारलं काय झालं.?

बघताच झालं पुन्हा,

 प्रेम मला तुझ्यावर,


जगण्यात रंग भरलेस तू.

तुपातल प्रेम सुपाने वेचलं,

क्षणात तू, मनात तू.

तुझ्या हृदयाने 

मला फरफटत ओडलं.

आव आणतोय अख्खा गाव,

पोरीनं पोराला ठार, बिघडवलं.


जानू तुला पाहिल्यांदा पाहिलं तेव्हा

असं वाटलं काळ्या म्हशीने,

 फेअर अँड लव्हलीचं चॅलेंचं जितलं.

कडू आहे सारं जगणं त्यात तुला मिसळतो.

आपल्या दोघांची जोडी पाहून सारा गाव जळतो.

भिंगरच्या काटीला लाल दिवा बांधतो.

नजर लागत्या भलतीच तुझ्या माझ्या प्रेमाला 

लिंबूला टाचण्या टोचून तुझ्यावरून उतरून टाकतो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama