कोरडा
कोरडा
उजाडली पहाट तरी
रवी दिसेना डोळ्याले
कावरेबावरे जनावरे
घना माह्या धन्या तू का घेरले
दावणची गुरे गोठ्यात
आशेनं हंबरडा फोडे
निजला का धनी गाड
आरवणेने गुंजेले ते खुराडे
आकांताने त्या साऱ्या
घराचे वासे हादरले
पोशिंद्याने अमुच्या कायमचे
कोण्या परदेशा जाणे केले
जिवापाड जे जपलं
पीक रे पोरकं झालं
सावलीच झाडं आज
काळ बनून जे आल
कसा करू सांग सांभाळ
लेकरां पुढे आता काटेरी वाट
पडली राधा एकलीच
कायमचा फिरवून गेलास पाठ
अंधार नशिबी देऊन
आज कसा मेघा तू बरसला
तुझ्या कोरड्या ने माह्या
कुंकूवाचा घात केला...
