STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Drama Tragedy Others

3  

Vilas Yadavrao kaklij

Drama Tragedy Others

जान

जान

1 min
277

शाळा सगळ्याच बंद

घरात विद्यार्थी बंद

मास्तर ऑनलाईन दंग

याची समाजासी जाण ।


   बाप माझा सकाळीच

  घेतो चारचाकी गाडा

  गली-गलीत विकतो

  बाप ताजा भाजीपाला।


गली-गलीत फिरोनी

जमा करितो रूपया

कसा घेईल तो फोन

याची शाळांशी जान।


उन्हात गल्या फिरोनी

बाप शब्दाला जागतो

मुला भविष्याची जान।


चिमटा पोटाला देतो

स्वप्ना बाप मुलाचे

साहेब होणे बघतो

मास्तरा देव जाणतो।


म्हणोनी सर्वा सांगतो

विद्यार्थी माना आपले

हेची ते खरे दैवत

विलास मास्तरा जान।

------------------------


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama