संसारचे स्वप्न
संसारचे स्वप्न
पाहतो आहे अजूनही तेच स्वप्न
होशिल तू माझी स्वप्नातील राणी
गाऊ ती गोड संसाराची गाणी
देवून तू सर्वंस्व होशिल का राणी ।
पाहतो आहे अजूनही तेच स्वप्न
होऊन जागा आस तीच राणी
सरले अर्धेअधिक जीवन गाणी
शेवटच आस ती होशिल का राणी ।
पाहतो आहे अजूनही तेच स्वप्न
झाली जीवनात दुसरी ती राणी
माडूंन संसार गाऊनी संसार गाणी
तरीही मनी वाटते व्हावे तूच राणी ।
पाहतो आहे अजूनही तेच स्वप्न
सत्यात उतरवून व्हावी तूच राणी
झाले वय गातो विदाईची गाणी
तरीही वाटते व्हावे तूच राणी ।
पाहतो आहे अजूनही तेच स्वप्न
पुढील जन्मी व्हावी तूच राणी
गाऊ एकची संसाराची गाणी
अन् संसाराला काय व हव राणी ।
+++++++++++---++++++++
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )
