STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Abstract Drama

3  

अमोल धों सुर्यवंशी

Abstract Drama

होळी रे होळी..

होळी रे होळी..

1 min
283

फदेव,,, फदेव,, फदेव,,, ओ!!!!

बॉ बो बो बो बो बो...!!!!!


उर म्हणी उर डोंगरी उर !

आमच्या होळीला सोन्याचं तूर.!!

वांग म्हणी वांग किलारी वांग

राखत पेरल्या सोनरी रांग.!!!


रात म्हणी रात,निगारी रात

पाटील खातोय,वरण भात.!!!

तोडा म्हणी तोडा,पायातला तोडा.

होळीला नाही आला पायतानान झोडा.!!!


खर्डीच्या भोंग्याला अडाणी टोंगा.

वड्याच्या झाडाला किमानी झोका.

रात्रीच्या भरी शेतात शिरतोय.!!!

भेटलं ते डोईवर हुरपून आणतोय.

सजाला होळदेव बघून हसतोय.

गावातला पट्या चोर होळी खेतोय.!!!!


झंगोडा,झंगोडा,

रताळ्याच्या रानात,लाकडाचा खच.

बारक्या,मोरक्या चोरीच्या चरक्या.

लुटून घेऊ, दगडू मारतोय डुलक्या.!!!!


हिथला चोटोक, आणि तिथला खावीस.

शिवार सार धग धग करी.

चांडाळ, चवकडी, दूर दूर पळी.!!!!

कसल भूत अन असलं काय,

भराडी देवीचा आशीर्वाद हाय.!!!


अरे जळत्या होळी सार वाईट जाळी.

निरोगी मन ठेव, ही तिची, निरोगी खेळी.

शिमगा करतोय साजरा,सांगतोय मराठी थोरी..!!!!


होळी रे होळी शिमग्याची होळी.

या वर्षी तरी भेटलं का?कोरोनाची गोळी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract