मैत्रीचे बंधन
मैत्रीचे बंधन
मैत्रीचे बंधन
रिमझिम पडती पाऊस धारा
सोबतीला हा गार वारा
छत्रीची घेऊन साथ चालत होती
ती चीमूकली एक वाट//१//
वाटेत भेटला तिला
नवीन एक सखा
होता तो गोजिरवाना
बदक अनोळखा//२//
गोंडस असणारी ती पोर
मायेच्या धाग्याने विणला
तिने त्या बदकाशी
प्रेमाचा दोर//३//
पाण्याने तुडुंब भरलेले
छोटेसे ते डबके
उमटत होते त्यात
आनंदाचे ठिपके//४//
ना शब्दांची गरज,
ना भाषेचा कुठला संबंध
चालता चालताच जुळले
हे मैत्रीचे अनोखे बंधन//५//
