सुखाचा शोध
सुखाचा शोध
सुखाचा शोध
एखाद्या गरीबाच्या ओठावर
तुमच्यामुळे येणार हसू
म्हणजे सुख //१//
घराच्या अंगणात
आपल्या आवडत्या
व्यक्ती सोबत बसून
तासंतास गप्पा करणे
म्हणजे सुख //२//
एखाद्या चिमुकल्याला
त्याची आवडती
वस्तू मिळाली की
त्याच्या चेहऱ्यावर
दिसणारा आनंद
म्हणजे सुख//३//
एखाद्या संकटात
अडकलेल्या प्राण्याला
सोडवल्यानंतर
त्या प्राण्याची हालचाल
म्हणजे सुख //४//
सुख म्हणजे
आपल्याच मनाचा खेळ
मानल तर आहे
नाहीतर नाही//५//
पैशाच्या ढिगार्यात
सुख नाही तर
रोज आवडीप्रमाणे जगणे
म्हणजे सुख //६//
सुखाला शोधत बसू नका
त्याला जगा
कारण ते आपल्या
मानण्यावर आहे //७//
✍️कविता सचिन रोहणे
सातारा, महाराष्ट्र
