STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Tragedy Fantasy Thriller

4  

Kavita Sachin Rohane

Tragedy Fantasy Thriller

अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस

1 min
5

अवकाळी पाऊस
​ऋतूमध्ये आज
 अजबच बदल झाला
बघुन त्याच्या कडे नभानेही
 वेगळाच रंग दाखवला//१//
धो धो येवून 
जमीनीला दिला घेरा
 निसर्गाला घातला 
अवकाळी फेरा//२//
अपेक्षा नव्हती , 
न होती काही लक्षणे
कडकडीत त्या उन्हात
 बाहेर ही पडता येत नसे//३//
अचानकपणे दाटला काळोख
कडकडू लागल्या विजा
अन् धो धो बरसला की हो
 हा मेघ राजा//४//
सर्व पिकांची झाली नासाडी
आता बळीराजानेच ति सोसावी
उघड्यावर आणला त्याचा संसार
अवकाळी या पावसाने
 केले नुसते बेजार//५//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy