माझी कन्या
माझी कन्या
1 min
4
घरात असली की
घर डोक्यावर घेते
घरात नसली की
घर सुन्न होते//१//
खळखळून तीच हसणं
मनाला आनंद देते
रडका -पडका तिचा चेहरा
दिवस माझा खराब करते//२//
निरागसपणा तिचा मला
सदैव खिळवून ठेवतो
तिच्या आनंदासाठी
परिश्रम खूप मी घेतो//३//
काळजी असते सगळ्यांची
रागही तेवढाच असतो
मनपसंत काहीतरी भेटल्या
शिवाय तो जात नसतो//४//
आई असते राणी
तर बाबा राजा असतो
हुकूम मात्र घरात
इतर
कुणाचा चालत नसतो//५//
