संत ज्ञानेश्वर महाराज..
संत ज्ञानेश्वर महाराज..
जन्माष्टमीला जन्म झाला
एक अलौकिक हिरा
पृथ्वीवर आला ..
सर्वगुणांनी परिपूर्ण
तेजो मय रूप बघून
माय -बापाला आनंद झाला ..
महान त्यांची कार्य
अप्रतिम त्याचे लेखन
देवच जनू मुखी ज्ञानोबाच्या
बोलू लागला..
रेड्याकडून वदवून घेतले वेद
बघून तो नजारा
अचंबित झाला लोक ..
चालवून भिंत भाव-भावंडासह
गळून पडला अहंकार
चांगदेवाचा ..
करविलेस दर्शन दैवी शक्तीचे
असा तू अप्रतिम विठू भक्त..
सखा नाम देवाचा
भक्त तु विठुरायाचा
शत शत नमन तुला माऊली ..
जनक तू ज्ञानेश्वरी अन्
असंख्य वेदांचा..
