पुस्तकांची दुनिया
पुस्तकांची दुनिया
हरवले कुठे मी मला कळेना
पुस्तकांचा हा पसारा मला आवरेना..
काही आवडती, काही नावडती
अजब ही पुस्तकांची दुनिया
शब्दांची ओळखच जणू घडवती..
ज्ञानात माझ्या भर ही पुस्तके घालती
जगण्याची कला ही मला शिकवती..
जादू पुस्तकांची वाचनाची आवड वाढवती
काल्पनिक दुनियेला मूर्त रूप ही देती..
पुस्तकांसारखा मित्र कोठेही सापडेना
साथ त्याची असतांना
मन कुठेही हरवेना..
शब्दांचा खेळ करुनी
पुस्तकच हसवतं
मनात त्याच्या आलं
तर कधी ते रडवतं..
