कुठे आहे माझा मोबाईल
कुठे आहे माझा मोबाईल
शीर्षक-कुठे आहे माझा मोबाईल
काही तरी नवीन
बनवायच आहे मला
आईला विचारण्यात
वेळ घालवायचा नाही मला
कुठे आहे माझा मोबाईल..
सरकार ने नवीन योजना
काढली आहे मने
चौकशी कशी करावी
प्रश्न आहे पुढे
कुठे आहे माझा मोबाईल..
आई अगं मला
पैसे थोडे पाहिजे
बँकेच्या रांगेत
नाही उभे राहायचे
कुठे आहे माझा मोबाईल..
दादाच्या लग्नाची
तयारी सुरु आहे भारी
चर्चा करायला फॅमिली
ग्रुपवर जमलीत सारी
कुठे आहे माझा मोबाईल..
मोबाईलची ही दुनिया
वेड सगळ्यांना लावते
चारचौघात असून
एकांत दावते
म्हणूनच मी म्हणते
कुठे आहे माझा मोबाईल..
