STORYMIRROR

SAMPADA DESHPANDE

Comedy

3  

SAMPADA DESHPANDE

Comedy

अजूनही यौवनात मी

अजूनही यौवनात मी

1 min
543

अजूनही यौवनात मी

जरी थकले हातपाय तरी हिम्मत माझी भारी

सत्तराव्या वर्षीही प्रेमात पडायची तयारी

घाल सखे तुझा चष्मा टाक नजर माझ्यावर

येता जाता नजर असते तुझ्या घरावर

रोज बघतो तुला लपून एकदा तुही बघ ना समोर

माहित आहे मला तू एकटीच असतेस 

मुले आहेत ना सुखात त्यांची चिंता का करतेस 

आता स्वतःचे सुख शोधूया 

एकमेकांच्या संगतीने पुन्हा जगूया

जाऊ कधीतरी फिरायला दोघे हातात घालून हात 

घाबरतेस कशाला लोकांना सोड त्यांची बात 

खाऊ आईस्क्रीम ,पाणीपुरी, अन बसू बागेत 

भविष्याची स्वप्न नको वर्तमानाचेच करू बेत 

दिसते रोज समोर तुझी छबी आवडती मज तुझे गाल गुलाबी

ए मेरी मेहेरजबी माझ्या प्रीतीची देतो मी हमी

प्रेम करीन तुझ्यावर भरभरून अजून यौवनात मी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy