STORYMIRROR

SAMPADA DESHPANDE

Comedy

3  

SAMPADA DESHPANDE

Comedy

पावसा तू थांबशील का ?

पावसा तू थांबशील का ?

1 min
180

विडंबन - (आता तरी देवा मला पावशील का?)

आतातरी पावसा तू थांबशील का ?

घरी कशी जाऊ हे सांगशील का?


वात आणलाय आधीच कोरोनाने

त्यात चालू झाले ट्रेनचे रडगाणे

थांबून जरा उपकार करशील का

घरी कशी जाऊ हे सांगशील का?||


वाट पाही घरी माझे छोटे बाळ

स्टेशनवर सांग थांबू किती काळ ?

अरे थोडीशी विश्रांती घेशील का ?

घरी कशी जाऊ हे सांगशील का? ||


परिचारिका मी करते लोकांची सेवा

किती दिवसांनी घरी जाते रे भावा

विनंती माझी तू ऐकशील का ?

घरी कशी जाऊ हे सांगशील का?||


लोक म्हणती तू शेतकऱ्याचा सखा

मग वागतो का रे असा शत्रूसारखा

आतातरी मैत्रीला जागशील का

घरी कशी जाऊ हे सांगशील का?||


ओढ मज घराची वाटे वरुण देवा

आता चालू केला तुझाच धावा

प्रार्थनेला माझ्या तू पावशील का?

घरी कशी जाऊ हे सांगशील का?||


आतातरी पावसा तू थांबशील का ?

घरी कशी जाऊ हे सांगशील का?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy