STORYMIRROR

SAMPADA DESHPANDE

Others

3  

SAMPADA DESHPANDE

Others

गुलाबी थंडी

गुलाबी थंडी

1 min
154

मंद मंद झुळकेतून 

सोनपावलांनी येते

केशरी रम्य सकाळी

पापण्यांना जडावते गुलाबी थंडी ||१||


पांघरून चादर धुक्याची

दवबिंदूंचे मोती सांडते

पानांना करुन गुदगुल्या

हळूच हसवते गुलाबी थंडी ||२||


पक्षांच्या घरट्यांमधून

काही क्षण विसावते

पिलांशी करून हितगुज

अलगद जोजावते गुलाबी थंडी ||३||


नदिवर पसरते जणू

पांघरली तिने दुलई

नेत्रांना सुखावणारी भासे

दुधावरची साई गुलाबी थंडी ||४||


कवी कल्पनांतून झरणारी

युगुलांच्या मनी फुलणारी

अंगावर रोमांच उमटवणारी

हवीहवीशी वाटणारी गुलाबी थंडी ||५||



Rate this content
Log in