मानवा तू जाण रे !
मानवा तू जाण रे !
निसर्ग आपुला असे सखा | मानावा तू जाण रे
वाचवून आपले पर्यावरण | वाचव आपले प्राण रे ||
वृक्ष असती मित्र आपुले | करूया रोपण नि संवर्धन |
देती सावली, फळे, फुले | देती आपणा जीवन ||
प्राणवायू मिळेल मुबलक | वायू प्रदूषण होईल दूर |
निरोगी होईल जीवन |जर प्रेम कराल वृक्षांवर||
वाहने इंधनाची जनहो | पर्यावरणासी घातक |
वापर करून कमी त्यांचा | होऊ पर्यावरणाला पूरक ||
प्लॅस्टिक वापर टाळून | राखू पर्यावरणाचा समतोल |
पर्याय त्यास शोधूनिया | वाचवू जीव अनमोल ||
पाण्याचा टाळू अपव्यय | रोखू जल प्रदूषण |
समुद्र नद्या ठेऊ स्वच्छ | करू शुद्ध जीवन ||
राबवून स्वच्छता मोहीम | करू स्वच्छता परिसराची ||
वातावरण होईल शुद्ध | गुरुकिल्ली ही आरोग्याची ||
झाडे लावा ! पाणी वाचावा ! | मंत्र आहे हा खरा हो |
पर्यावरणाला वाचवण्याची | आस ही मनी धरा हो ||
पर्यावरणाचे महत्व सांगून | वाचवण्याची आस धरू |
पुढच्या पिढीला करू सतर्क | निसर्गाची कास धरू ||
पर्यावरणाला वाचण्याचा | मानवा ठेवी मनी भाव |
वाचेल आपली पुढची पिढी | वसुंधरा म्हणेल आयुष्मान भव ||