STORYMIRROR

SAMPADA DESHPANDE

Others

3  

SAMPADA DESHPANDE

Others

वाट धुक्यात हरवली (शेलकाव्य)

वाट धुक्यात हरवली (शेलकाव्य)

1 min
206


 

वाट धुक्यात हरवली 

हरवली गर्द वनराई 

वनराई सवे सारी सृष्टी  

सृष्टी पांघरली शुभ्र दुलई ||१||


दुलई दाट धुक्याची सुंदर 

सुंदर दवबिंदूंची पानांवर नक्षी 

नक्षी शोभे तृण वृक्षांवर 

 वृक्षांवर विसावले तान्हे पक्षी ||२||


पक्षी गारठले गुलाबी थंडीत 

थंडीत सर्वत्र उब शोधति

शोधति उबारा पिलांसाठी 

पिलांसाठी उबदार घरटे बांधती ||३||


बांधती घरटे सानिध्यात निसर्गाच्या 

निसर्गाच्या रंगात सारे रंगले 

रंगले रंगानी धुक्याच्या शुभ्र 

शुभ्र सारे जग झाले ||४||


झाले नभही आज शुभ्र 

शुभ्र रंगाची उधळण ओली 

ओली रानाची हिरवी वाट 

 वाट धुक्यात हरवली ||५||



Rate this content
Log in