आई
आई
जिची तुलना जगी नाही, अशी माझी आई |
घास तुझ्या हाताचा जणू घोट अमृताचा |
धडा तू शिकवलेला पाया आयुष्याचा |
कष्ट तुझे घरासाठी आधार तू घराचा |
जन्मले गर्भातून तुझ्या अभिमान याचा |
ओळख माझी तुझ्यामुळे, तू आरसा माझा |
होऊन तुझ्यासारखी चालवीन वारसा तुझा|
तू असशी वटवृक्ष, देशी सर्वांना सावली |
मी वेल छोटीशी, तुझ्या कुशीत लपली |
तुझी कन्या मी छोटी, देते तुला हे वचन |
तुझ्या सुखासाठी, वेचीन सारे जीवन |
संस्कार तुझे मौलिक, आधार जीवनाचा |
जन्मदात्री, मैत्रीण, गुरु काय म्हणू तुला? |
