STORYMIRROR

SAMPADA DESHPANDE

Comedy

3  

SAMPADA DESHPANDE

Comedy

कोरोना इफेक्ट

कोरोना इफेक्ट

1 min
248

आला आला कोरोना आला

सगळ्या स्वप्नांची वाट लावून गेला

वर्षभर मान मोडून केला अभ्यास

सुट्टीत करीन मजा ही मनी आस

वाटले होते मस्त फिरीन गावात

कोरोना तुझ्यामुळे अडकलो घरात

 हे असे का झाले सांग ना आई !

मित्रांची भेट इमर्जन्सी सर्विस का नाही?

वाटले होते होईल मामा - मावशीची भेट

पण काय करू घरात अडकलो थेट

तुम्हा दोघांसोबत करणार होतो टूरच बुकिंग

आता तुझ्याबरोबर करतोय घरात कुकिंग

फोनवरच होते मित्रांची व्हिडिओ भेट

त्यांच्याबरोबर ग्राउंडवर कधी खेळणार क्रिकेट?

आई प्रश्न पडतो एक वेगळा

तुला कसा ग नाही येत कामाचा कंटाळा ?

तू नेहेमी म्हणते घरी राहा सुरक्षित राहा

ज्यांना घर नाही अशा लोकांकडे पहा

कुठून येते तुला पॉझिटिव्हिटी इतकी ?

कोरोना जाईल हि तुला खात्री पक्की

आता मीही ठरवलंय पॉझिटिव्ह राहायचं

या लॉकडाऊन मध्ये रोज एक चित्र काढायचं

पुन्हा मित्र भेटू दे मिळो आनंदाचा ठेवा

एकच मागणे हा कोरोना लवकर घालवं रे देवा

हा कोरोना लवकर घालवं रे देवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy