हॅपी न्यू इयर !
हॅपी न्यू इयर !
शुभेच्छांच्या संदेशांनी भरुनी वाहू दे
मोबाईलची रिंगटोन सतत वाजू दे
वायफाय तुझा कधीही बंद ना पडावा
अगणित टॉकटाईम सतत लाभावा
डेटापॅक तुला खूप स्वस्त मिळावा
नेटवर्कमधे कधीच खंड ना पडावा
तुझ्या हातातला पेला रिकामा नसावा
वेगवेगळ्या पेयांनी भरुनी वहावा
ताटलीत मिष्टान्ने पडत रहावी
सदा सुख आरोग्याची संगत लाभावी
व्हॉटसॅप फेसबुक ट्विटर अखंड चालू दे
नवीन वर्ष तुला खूप सुखाचे जाऊ दे