जगणे माझे
जगणे माझे
स्वप्ने नाही,आशा नाही,अपेक्षाही नाही
ही जगण्याची परिभाषा नाही
माझ्या या रित्या मनाला
कशाचीच अभिलाषा नाही...
जग वाटे सूने सूने सारे
का मजला कळत नाही
भंगलेल्या मनाचे माझ्या
तार कधी जूळत नाही..
माझे आहे पण..पण माझे नाही
मी पणाचे ओझेही नाही
कोणती वेदना जाळते मनाला
हेच मजला उमजत नाही...
सुकून जाते मी सुकूमारी
फुलते कधी मी नाजूकशी
हळवे होते मन हे माझे
दाटून येते दुःख मनाशी..
क्षणात हसती मन हे वेडे
क्षणातच दाटे सुख गहीरे
क्षणा,क्षणात बदलत्या मनाला
सांग सख्या मी कशी आवरू रे..
