ऋण
ऋण
असता शून्यात तुझ्या गर्भात
आई अनुभवली तुझी माया.
खूप कष्ट सोसली माझ्यासाठी
सारा जग मला हा दाखवया.
ऐकून बोबडे ते बोल माझे
येत होते तुझ्या गालावर हसू.
कधी कधी माझी जिद्द बघून
म्हणत होती बाळ नको तू रुसू.
जेव्हा माझ्या पैंजनाचा निनाद,
राहत होता नेहमी तुझ्या कानी.
माझ्या सुखासाठी शेकडो मैल
आई, तू चालत होती अनवाणी.
आई तुझ्या मायेचा ओलावा,
आहे गं माझ्या हृदयात टिकून.
तुझे ऋण फेडू शकत नाही मी,
दिली जरी सारी संपत्ती विकून.
