STORYMIRROR

Sangita Bambole

Tragedy

3  

Sangita Bambole

Tragedy

प्रेम

प्रेम

1 min
142

दिवसातला प्रत्येक क्षण 

तुझ्या आठवणीशिवाय जात नाही

आणि तुझे स्वप्न पडल्यशिवाय

गाढ झोपही लागत नाही.

का,का इतकं प्रेम करतो वेड्यासारखा

कोसोदुर असतो,नजरेआड असतो

माझ्या शिवाय तुझी सकाळही होत नाही

आणि माझ्याशिवाय रात्र पण होत नाही.

खूप कामात असतो खूप व्यस्त असतोस

 पण आज कळलं की तू खरचं माझ्या वर प्रेम करतो.

तू येशिल आणि मला मिठीत घेशिल

माझ्या मनातील भावनांना समजून घेशिल

वर्षानुवर्षे याच धुंदीत मी जगत असते

आणि तू फक्त आणि फक्त होकार देतोस

भेटायचं मात्र कधी ठवरतच नसतोस.

सात जन्म सोबत रहायचं वचन 

तुचं दिलं होत ना रे मला

मीही तुझ्या शब्दांला होकार दिले होते

आता वर्ष संपायला पण आले आणि

आयुष्यातले दिवस पण कमी व्हायला लागले

कधी एकदा भेटशिल सांगून तरी टाक ना

मनातील गुपित स्पष्ट पणे माझ्या सोबत बोल ना.

आता मात्र माझा अंत संपायला आलाय

आता तुझ्या व्यस्त जीवनापासून

मलाच दुर व्हायचं आहे

आणि होतं नव्हतं सारचं आता संपवायच आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy