नशा
नशा
काय सांगू बाप्पा
लई इपरीत घडलं
मास्तरची नोकरी
अन् खेड्याला धाडलं
खोडेल व्हती पोरं
नव्हती अभ्यासाची गोडी
उत्तरं ऐकून एकेकाची
झाली पळती भूई थोडी
इचारलं म्या एकाले
सीता कोणं पळवून नेली?
मायच्यान मास्तर
म्या नाय वो नेली
पाण्यात राह्यणाऱ्या प्राण्यांची
पाच नावं सांग पिराजी
मासळी तिचे माय - बाप
तिचा भाऊ तिची आजी
खुर्चीतून उडालो अन्
धपकन पडलो खाली
पहिल्याच दिवशी पोरांनी
नशा माही उतरवली
