जर
जर
जर माझ्या कडे पंख असते
तर पंखाने खूप लांब उडत गेले असते
पक्ष्यान सोबत शर्यत लावली असती
तर तेव्हा मी पाहिली आली असती
इकडून तिकडे फिरे गरा गरा
माझे पंख उडे भरा भरा...||ध्रु||
जर माझ्या कडे मनाची शक्ती असती
तर मी सगळ्याची मने ओळखली असती
ज्यामुळे मला कोण आपले
कोण परके कळले असते
मनशक्ती मुळे मी फिरून
आले असते चहूकडे
मन माझे न राहे एकी कडे ...||१||
जर माझ्या कडे असती परीची छडी
तर मी सर्वांची दुःखे लावली असती पळवून
दुःख नसती तर सर्व जवळ आली असती
पण त्याची कदर कोणी कधी केली नसती
परी ची छडी फिरे गरा गरा
जादू होई सगळी कडे भरा भरा...||२||
