राजा नी सर्जा ....
राजा नी सर्जा ....
मालक हाक आमची ऐका ना ....
अहो , मालक हाक आमची ऐका ना ...
आम्ही तुमचे राजा नी सर्जा हो ...
हांबरण्यातून तुमच्या नावाची करतो रोज गर्जना ....
जास्त काही नको हो आम्हा ....
चारा नी पाणी दया जरा जरा ....
जेणे करून तुमच्या शेतात ...
राबता यावं आम्हा दिन रात ....
उपाशी पोटी मशागत करतांना ...
मेहनत कमी नको पडावी बस एवढीच बात ....
मालक ऐका हो अमुची गर्जना ....
झालो जरी आम्ही म्हातारे ....
अहो मालक ,, झालो जरी आम्ही म्ह
ातारे ....
तर म्हातारे होई पर्यंत राबेल तुमच्याच रानात ....
मालक जरा कान तुमचा इकडे करा ....
अहो , मालक कान जरा तुमचा इकडे करा ....
काही सांगायचे आहे आम्हाला तुमच्या कानात ...
झालो जरी आम्ही म्हातारे ...
म्हणून देवू नका आमचा बळी....
आल जरी मरण तर येवूद्या तुझ्याच दारी ....
नशिबानं दिली साथ तर ...
अहो मालक , जर नशिबानं दिली साथ भारी ....
तर येईल पुन्हा मालक तुमच्याच दारी ...
होवून राजानी सर्जाचीच जोडी ....