भाजीवाला
भाजीवाला
रोज रोज फिरते दारोदारी
घेवून ताजी ताजी तरकारी
आवाज देतो जोराने ताजी, ताजी
घ्या भाजी म्हणतो काकू,आजीबाई
गोड गोड बोलून कडू कारली
पण विकतो सर्वाला....||ध्रु||
रोज रोज फिरते दारोदारी
म्हणतो ताजी ताजी माझी तरकारी
घ्या हो तुम्ही वारकरी
रोज सकाळ संध्याकाळी विकतो
भाजी जावून सर्वांच्या दारी
हिरवी हिरवी भाजी घेवून
फिरतो चारपाई वरती....||१||
रोज रोज फिरते दारोदारी
हिरवी हिरवी पालक भाजी
घ्या हो तुम्ही आबाजी
कोहळी कोहळी काकडी
मोजून देतो तागडी वरती
काकडी कडू नसेल तुम्हा सांगते
घ्या तुम्ही माझ्या विश्वासा वरती....||२||