STORYMIRROR

Sushama Gangulwar

Comedy Inspirational

3  

Sushama Gangulwar

Comedy Inspirational

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
168

तू आई , तू बहीण, तू मुलगी, तू पत्नी 

नारी तुझे अनेक रूपे 

तू काली, तू दुर्गा, तू लक्ष्मी, तू चंडीका 

देवी तुझे अनेक स्वरूपे......


अफाट तुझी सहनशीलता 

करू शकेल का गं कुणी गणती 

जिच्या उदरातून जन्म घेता 

तिचाच विजवता का रे पणती.......


किरण, कल्पना, सानिया,मेरी 

सारेच कीर्तीवंत महिला 

सिंधुताई , सावित्री, झाशीची राणी 

कित्येकांना लढा देताना पाहिला.......


भव्य तुझी शक्ती गं नारी 

किती झेलती वेदना 

विधवा,कूल्टा, वांज ऐकुणी 

गप्प राहती किती तुझी तपोसाधना.....


पंतप्रधान, मुख्यमंत्री ,राष्ट्रपतीचा

ही मान पटकाविला पहिला 

क्रिकेट, कुस्ती, कब्बडी 

कुठल्या क्षेत्रात कमी नाही गं महिला.....


पोटचा गं गोळा तुझा जन्म देताना 

किती अगणित कळा तू सोसते 

तुझ्याच रक्ताला बापाचे लावूनि नाव 

मोठ्या मनाने स्वीकारते......


मनकोवळी, हिंमतवाली, लाजवनती 

हिरकणी तू , तुचं गं रणरागिणी 

तुचं जननी , तुचं माता, तुचं आई 

नारी तुचं गं शक्ती रूपी दामिनी......



Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy