STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

3  

Sushama Gangulwar

Others

पुस्तक

पुस्तक

1 min
138

शोधती जगी सारे 

साधन ते करमणुकीचे 

गुंतवता मन पुस्तकात 

भान नसे पुन्हा वेळेचे......


मित्र तो भेटे खरा पुस्तकात 

जे वाचल तेचि पेराल 

जाणीव ना एकलेपणाचे 

घट्ट हात जे पुस्तकाचे धराल.....


अन् विकत घेता येत नसतो 

एवढे ज्ञान मिळे पुस्तकी 

म्हणूनच संविधान रूपी विचार 

सुचले बुद्धिवंत भीमाच्या मस्तकी.......


स्त्री शिक्षणाच्या कार्याचा 

घेतला वसा सावित्रीने 

स्त्रियांना ओळख झाली पुस्तकांची 

सावित्री-ज्योती यांच्या संघर्षाने 


पुस्तक हसवते,रडवते 

पुस्तक भल्या भल्यांना घडवते 

एकदा का,कळले त्याचे सौंदर्य

मग पुस्तक ज्ञानाने मढविते......


पुस्तक वागायला शिकवते 

पुस्तक बोलायला शिकवते 

पुस्तक गुरुकिल्ली संस्काराची 

नम्रतेने झुकायला सुध्दा शिकवते......


पुस्तक ताठ चालायला शिकवते 

उंच शिखर गाठायला शिकवते 

वेळ पडले तर पुस्तक माणसाला 

अभिमानाने लढायलाही शिकवते.....


पुस्तक, पुस्तक,पुस्तक 

ज्ञान सागराचा विशाल झरा तू 

मनापासून जे स्वीकारले तुला 

उभा खंबीर तया पाठी खरा तू........


Rate this content
Log in