STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

3  

Sushama Gangulwar

Others

पिंजरा

पिंजरा

1 min
155

पशुपक्ष्यांना ठेवायचो आम्ही 

नेहमीच पिंजऱ्यात डांबून 

आज स्वैर उडत आहेत ती 

मानवास घरात बंदिस्त पाहून......


उडणाऱ्या त्या पक्षांच्या 

पंखातील हिरावून घ्यायचो बळ 

स्वच्छंदी निशाचर पाही 

आज कैद मानवाचा खेळ.....


शो पीस म्हणून कैद होती 

पार्कमध्ये कित्येक प्राणी 

आज मुक्या जनावरांकडून नव्हे 

तर मानवास मानवी स्पर्शाची हानी.....


माकडाला तालावर नाचवून 

आम्ही माणसं पोटं भरणारे 

आज माकड म्हणतोय माणसा 

अदृश्य विषाणू नाचवतोय तसा नाचणारे.....


चार दाण्याचे आमिष दाखवून 

पोपटाला ही करायचो आम्ही बंदिस्त 

आता हे अदृश्य विषाणू मात्र 

आम्हास वारंवार करत आहे फस्त........


स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही 

पर्यावरणाचाही करायचो ऱ्हास 

आज क्षणा क्षणाला होतोय 

आम्हा श्वास गुदमरण्याचा त्रास......


पशू,पक्षी,पर्यावरण कधी कुणालाच 

सुखाने दिले नाही आम्ही जगू 

माहीत नाही आम्ही देखील कधी 

या महामारीच्या पिंजऱ्यातून निघू.......


Rate this content
Log in