STORYMIRROR

Sushama Gangulwar

Romance

3  

Sushama Gangulwar

Romance

गुलमोहर प्रेमाचा

गुलमोहर प्रेमाचा

1 min
270

रिमझिम पावसाच्या सरित 

बहरला गुलमोहर प्रेमाचा 

श्रावण सरिच्या आगमनाने 

योग आलाय तुझ्या माझ्या भेटीचा.....


चल नाचू गाऊ होवून बेधुंद 

विसरुन तान जीवनातले 

बोल आज निसर्गाच्या सानिध्यात 

सख्या गुपित तुझ्या मनातले.....


ऐकते मी निशब्द सख्या 

होवुनि थेंब त्या पावसातले 

घेऊ मनमुराद आनंद 

आठवू क्षण सुखद प्रेमातले......


पाहू प्रतिमा तुझी माझी 

त्या इंद्रधनूच्या सप्तरंगात 

चल हातात घेऊनी हात 

येऊया फिरून काळ्याकुट्ट नभात.....


बसू दोघे निवांत नदी किनारी 

घेऊनी एकमेकांचा सहारा 

जावा अलगद स्पर्शून तुला मला 

तो बेधुंद वाहणारा वारा........


पावसाच्या सरित घेऊ भिजून 

बहरणा-या प्रेमाच्या गुलमोहरात 

आठवांच्या पावसात राहू नित्य 

तू माझ्या अन् मी तुझ्या ह्रदयात......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance