STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

3  

Sushama Gangulwar

Others

मोलकरीण

मोलकरीण

1 min
137

हो आहे ती मोलकरीण

म्हणून काय झालं

लोकांची धुणी भांडी करून 

ती स्वतःचं संसार उभ केलं.....


पदर पसरून रस्त्यावर 

भीक तर नाही मागत 

स्वावलंबी जगणं तिचं 

लाचाऱ्या वाणी तर नाही वागत.....


कुणाच्याही घरात ती 

लागेल ते काम करते 

आणि स्व कष्टाच्या बळावर

ती मुलां बाळांच पोट भरते........


ती असेल जरी मोलकरीण 

मुलांना उच्च शिक्षण देते

पदर खोचून कमरेला

त्यासाठीच ती काबाडकष्ट घेते......


दररोज तुमचं घर स्वच्छ ठेऊन

घरात लक्ष्मी ती आणते

ती मोलकरीण आहे म्हणूनच ना

बहुतेकांच्या घरात तिचं राबते.........


तिच्या वेळापत्रकानुसार

खरतर तुमचं घर चालतं

एक दिवस वेळे वर नाही आली

तर सारं घर कोलमडून जातं.........


Rate this content
Log in