Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sushama Gangulwar

Others

3  

Sushama Gangulwar

Others

एक जिवलग मित्र

एक जिवलग मित्र

1 min
157


एकाने चार दिवस फोन नाही केला 

की लगेच दुसऱ्याने खबर घ्यावी 

जिवंत आहेस का खपला 

बिनधास्त असा प्रश्न केला तरी चालेल 

पण खुशाली विचारून घेणारा 

एक जिवलग मित्र नक्कीच असावा....


अधून मधून तुम्ही ज्या मित्राकडे 

नित्य फेरी मारत असता 

चार दिवस तुम्ही त्याला दिसले नाही 

तेव्हा बेचैन होऊन कळवळीने 

तुमच्या घराकडे धाव घेणारा 

एक जिवलग मित्र नक्कीच असावा.....


चूक झाली असेल तर हक्काने 

चुकलो यार माफ कर

असे म्हणणारे कोवळे हृदय असावे 

काही अनधिकृत गोष्टी घडल्या 

तर काळजातून विसरून जाऊन 

उत्स्फूर्तपणे घट्ट अशी मिठी मारणारा 

एक जिवलग मित्र नक्कीच असावा....


कधी-कधी समोरून माफ करणारे 

देखील एक विशाल हृदय असावे 

मैत्रीत हक्काने नक्कीच रुसावे 

पण अबोला मात्र कायमचा नसावा 

हळूच हसून चल यार chill कर 

मैत्रीत हे असं चालतंच असते म्हणणारा 

एक जिवलग मित्र नक्कीच असावा....


एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात 

कधी चित तर कधी पट 

चुका दोन्ही बाजूंनी होऊ शकतात 

मग एकच बाजू सही अशी कुवत नसावी 

दोन्ही बाजू पडताळून बघणारा 

एक जिवलग मित्र नक्कीच असावा.......


गोष्ट कुठली ही असो अडून बसू नये 

छोट्या मोठ्या कारणास्तव मैत्री तोडू नये

अजिबात जिवाला जीव देऊ नये 

पण आपल्याला जीव लावणाऱ्या मित्राला 

आयुष्यात कधीच न विसरणारा 

एक जिवलग मित्र नक्कीच असावा.......


वेळात वेळ काढून कधीतरी मनसोक्त 

मित्रा बरोबर सैर सपाटा करणारा 

घडलेल्या गमती जमती आठवून 

आनंदाने डोळे भरून येईपर्यंत हसणारा 

मान सन्मान देणारा नसेल तरी चालेल 

पण भावनांचा कदर करणारा 

एक जिवलग मित्र नक्कीच असावा.......


कुणासाठी काहीतरी स्पेशल करतो 

तेव्हा ती गोष्ट म्हणजे उपकार नसते 

तर त्या व्यक्तीच्या हृदयात तुमच्या प्रति 

सर्वात जास्त प्रेम व जिव्हाळा असतो

पण अशा निःस्वार्थ प्रेमाला ओळखणारा 

एक जिवलग मित्र नक्कीच असावा...


Rate this content
Log in