STORYMIRROR

Sushama Gangulwar

Comedy

3  

Sushama Gangulwar

Comedy

तिचं मन राखण्यासाठी

तिचं मन राखण्यासाठी

1 min
223

बघा माझ्या चेहऱ्यावर आले 

किती मोठे-मोठे पिंपल्स 

अगं त्याचेच खळगे बघ दिसतात 

किती छान स्माईली डिंपल्स......


माझ्या डोळ्या भोवती बघा 

किती झाले डाग सर्कल्स 

अगं टपोरे सुंदर डोळे दिसण्यासाठी 

तर काजळ लावतात गर्ल्स.......


बघा आज माझा मेकअप 

झाला नाही ना जास्त ओवर 

अगं उलट डाग, धब्ब्यांना 

चाणाक्षपणे केलस तू छान कव्हर......


अहो खरं सांगा या फोटोमध्ये 

मी दिसतं होती ना खूप जाडी 

अगं वेडे तेंव्हा तू नेसली होती 

कॉटनची जास्त फुगणारी साडी......


किती काही कुटाणे करते तरी 

लांबत नाहीत केस माझे का बरे ? 

अगं आजकाल शॉर्ट व मोकळ्या 

केसांचीच फेशन चालू आहे खरे.......


माझ्या पायात अशी flat चप्पल 

मला अजिबात नाही शोभत 

अगं वाकडं तिकडं मटकुण चालताना 

यात पडायची भीती नाही लागतं ....


अहो तिचं मन राखण्यासाठी 

चंद्राला ही पाडावा लागतो फिकं 

त्याला ही डाग होतं असं बोलल्यावर 

शांत राहतं घरवालीच डोकं.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy