भारतरत्न बाबासाहेब
भारतरत्न बाबासाहेब
14एप्रिल हा दिवस
महामानवाची जयंती
असा हा क्रांतिसूर्य
अनेक घडविल्या क्रांती.....
लहानपणापासूनच भीमा
होता अगदी ज्ञानी
सत्यासाठी लढली सदा
बुद्धीवंत भीमाची वाणी.......
भारतीय घटनेचा
खरा तो शिल्पकार
बहुजन व स्त्रियांचा
केला दूर अत्याचार.......
केला सत्याग्रह त्यांनी
चवदार तळ्याचा
अस्पृश्यांना केला मोकळा
मार्ग पिण्याच्या पाण्याचा........
दलितांचा खरा कैवारी
असा महान भारतरत्न
ज्ञान शस्त्राचा करून वापर
दूर सारला सारे यत्न.......
जाती धर्माचा थांबवण्या भेद
त्यांनी घेतली बौध्द दीक्षा
गेले शिकवून साऱ्या जगाला
मानवी धर्माची खरी शिक्षा......
दीप उजळवला देशात
शिक्षण आणि ज्ञानाचा
अशा वीर महापुरुषाला
कोटी कोटी मुजरा मानाचा.......
