Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sushama Gangulwar

Others

3  

Sushama Gangulwar

Others

तू आहेस कोण ?

तू आहेस कोण ?

1 min
176


तू मालकीण आहेस की कामवाली 

सांग आहेस कोण तू गृहिणी ॥ 

चार भिंतीच्या दुनियेत गुंतलेली

आहे तुझी एक भावनिक कहाणी ॥ 


तुझ्या कामाला,ना तासाचे बंधन 

ना मिळते तुला एखादी सुट्टी ॥ 

झाडू,पोचा,धुणीभांडी स्वयंपाक 

यांच्याशीच जमवलेस तू गट्टी ॥ 


तू म्हणतं का नाहीस गं

एखाद काम मला जमतं नाही असं ॥ 

तुझी प्रत्येक भूमिका तू इतक्या 

चोकपणे पार पाडतेस तरी कसं ॥ 


प्रत्येकाला मिळते कामाचा मोबदला 

महिन्याला पगाराच्या स्वरूपात ॥ 

तू दिवसरात्र काम करून देखील 

तुलाच नित्य का पसरावे लागतात हात ॥


सगळं काही तुझंच आहे म्हणतात 

मग का द्यावा लागतो तुला हिशोब खर्चाचा ॥ 

एखाद काम वेळेवर नाही झालं 

तर घरात तुझाच विषय का बनतो चर्चेचा ॥


तुला ना थकवा आहे ना मरगळ 

प्रत्येक वेळी जपतेस सर्वांचं मन ॥ 

तरीही तुझ्याच स्वप्नांना चुरगळून 

का केले जाते तुझ्या स्वप्नांचा दहन ॥ 


जगात कुणीच सांभाळत नाही 

येवढ्या भूमिका सांभाळतेस तू गृहिणी ॥ 

मग सांग तुझ्या अस्तित्वाची 

नेमक आहे तरी काय या जगी कहाणी ॥ 


Rate this content
Log in