STORYMIRROR

Gaurav Daware

Comedy Drama

4  

Gaurav Daware

Comedy Drama

शाळेतली पोट्टी

शाळेतली पोट्टी

1 min
261

शाळेत होता माया एका पोट्टीवर डोळा 

पण तिचा होता एक बॉयफ्रेंड भोळा 

म्या आता त्याले धमकवाच ठरवल

अन पोट्टीले माया मनात भरवल 


पोट्टी होती ते लईच गोर 

जसे बागेत नाचताहेत कावळे आणि मोर 

मलेबी दाखवाचा होता आपला जोर 

शिरायच होत जसा हृदयाचा चोर 


तिले आता मले पट्टवाचच होत 

बॉयफ्रेंडले तिच्या रस्त्यातुन हटवाचच होत 

म्हणुन करू आता एकच काम 

बोलवू लढाले अन करू तमाम 


त्याले धमकवासाठी सोबती जमवले 

हाता पाया पडत त्यांले मनवले 

म्या त्या पोट्याले डोक्यातच मापला 

लढासाठी चाकू घरातूनच ढापला 


म्या आता लढासाठी झालो तयार 

होते आता मायाजवळ शस्त्र अपार 

तो होता मैदानात आधीच हजर 

आम्ही झालो लेट कारण सायकल पंचर 


तो पोट्टा होता पहेलवान भारी 

आम्ही सगळे चिरकूट धारी 

त्याले पाहूनच माये सोबती पळाले 

मी होतो एकटा अन माया तोंडावर टाळे 


म्या मारले पाय उचलला माया 

पॅन्ट टरकन फाटली अन इज्जत गेली वाया 

टेलर न राव घोटाळाच केला 

उधारीत बरोबर शिवून नाही दिला 


म्या आता मानली मायी पटकन हार 

पडलो त्याच्या पाया अन जालो पसार

गेलो धावत टेलर कड अन दिल्या दोन शिव्या 

त्याची पोट्टी तिकडून आली म्हणे जाऊदे न बाव्या 


टेलर वाल्याची पोट्टी लयच भारी 

नाजूक तीच नाक सुंदर होती सारी 

आवाज होता जणू कोकिळेचा थवा 

लईच गोड होती तुम्हाले काय सांगू बावा 


म्या आता ठरवलं ईलेच पटवाच 

टेलर वाल्याला सासरा आपनच बनवाच

पोरी एवढ्या गोड, कावून रायते कळत नाही 

आम्ही आहोत कोळसे, तरी आमले अभिमान लयी.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy