मोबाईल रिचार्ज.....
मोबाईल रिचार्ज.....
आताचा मोबाईल रिचार्ज
लोकांनसाठी झाला मोठा विचार
आधी होता लिमिटेड टॉक टाईम
तरी लोक अनलिमिटेड बोलत राही
आता झाला अनलिमिटेड टॉक टाईम
तर लोक लिमिटेड बोली वर आली
विचार पडत आहे रिचार्ज सरत आहे..||ध्रु||...
आधी मोबाईल मध्ये राहत नव्हता रिचार्ज
तरी लोक राहत होती एकमेकाशी अट्याच्य
आता मोबाईल मध्ये आहे अनलिमिटेड रिचार्ज
तर लोकांच्याच नात्यातला सरला रिचार्ज
कस झालं या जगाच मोबाईल घेतात हजाराचा
शंभरचा रिचार्ज करता करता रिचार्ज होतो लाखाचा
विचार पडत आहे रिचार्ज सरत आहे..||१||...
आधी पाच रुपयात महिना डोले
आता तर दोनशे मधे अठ्ठावीस दिवस न बोले
बघता बघता तीस दिवसा वरून
रिचार्ज अठ्ठावीस दिवसा वर आला
पण पाच रू चा रिचार्ज कमी नाही झाला
उलट वाढतच चालला...
विचार पडत आहे रिचार्ज सरत आहे..||२||....
