नवा जमाना
नवा जमाना
अंबाडा सोडून झिपऱ्या उडाल्या,
एकीचे पाहून साऱ्याच बिघडल्या
आला जमाना हिल्स, जीन्स, टाॅपचा,
बदलला दॄष्टीकोन पाहण्या त्यांचा
साडीत खुले सौंदर्य असे नारीचे,
दागिने असोत हलके अथवा भारीचे
असावा पदर डोक्यावर की खांद्यावर,
सारेच अवलंबून असते समाजावर
